चाकूने ने वार करीत केले जखमी! मांडवगड येथे ही घटना घडली

वर्धा : मुलाला नेऊ नको, या कारणातून वाद करीत पत्नीला चाकूने मारहाण करीत जखमी केले. मांडवगड येथे ही घटना घडली. मि्थुनी पवार ही मुळाबाळांसह एकटी राहत होती. मांडवगड पारधी बेड्यात कार्यक्रम असल्याने ती मुलांना घेऊन गेली होती.

मात्र, पाऊस असल्याने तिने मुलाला तिच्या पतीकडे ठेवले होते. दुसऱ्या दिवशी ती पतीकडे मुलाला घेण्यास गेली असता पती संदीप पवार याने तू मुलाला नेऊ नको, असे म्हणून चाकूने मारहाण करीत जखमी केले.

सध्या हाणामारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. इतकेच नव्हेतर घरगुती कारणातून वाद होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून येत आहे. या किरकोळ घटनांतून मोठा वाद उद्भवण्याची शक्‍यता निर्माण झाली असून पोलिसांनी याकडे लक्ष देत याची दखल घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here