

पुलगाव : नजीकच्या कवठा झोपडी येथील गावाला लागून असलेल्या शेत शिवारात अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पुलगाव येथील बालाजी हॉटेल मालकाच्या शेतात रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोळ उठतानाचे पाहून नागरिकांमध्ये धडकी भरली. तत्कळ आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीएडी कॅम्प येथील अग्रिश्ममन दलाचे बंब व पालकेतील अग्रिशमन दलाचे बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आग विझविण्याचा प्रयत्न सुरु झाला असता हवा असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. पण, पाण्याचा मारा झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेने कुणाची जीवीतहानी तसेच नुकसान झाले नसून ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या असूनयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.