पवनार येथील धामनदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू! दोघे थोडक्यात बचावले

पवनार : येथील धाम पात्रात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकापैकी एकाचा पाण्यातबुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (ता. १६) सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. ओम संजय वानखडे वय १८ वर्ष रा. धंतोली वर्धा असे मृतकाचे नाव आहे.

सोमवारी सकाळी ९ वाजता आमो वानखडे आणि त्याचे दोन मित्र आकाश इंगळे वय २० वर्ष रा. आदिवाशी कॉलनी वर्धा, हर्षल काकडे वय २० वर्ष रा. रामनगर वर्धा हे तिघेही मिळून सकाळी वर्धेवरून पवनार येथे नदीत पोहण्याकरिता आले होते. दोघांना पोहण येत नसल्यामुळे ते पाण्यात उतरले नाही ओम याने मात्र पाण्यात छलांग लावली पाण्याचा अंदाज आला नसल्याने तोल नदीच्या खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खायला लागला.

सोबत असलेल्या मित्रांनी आरडा-ओरड केली मात्र त्यावेळी पोहणार तिथे कुणीही नसल्याने कोणतीच मदत ओमला मिळाली नाही आणि ओमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घडलेल्या घटनेची आपबिती मुलांनी घरच्यांनान कळवली त्यानंतर ओमचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले पाण्यात बुडालेला ओमचा मृतदेह बाहेर काढण्याकरीता पवनार येथील पोहण्यात तरबेज असलेले बारशीराम मोहिजे आणि बजरंग बावणे यांनी शर्थीचे प्रयत्न करुन मृतदेहाचा शोध घेत बाहेर काढले.

या घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छदनासाठी पाठवीण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here