पवनार येथील आठवडी बाजार सुरू करा! भाजीपाला विक्रेत्यांची ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदनातून मागणी

पवनार : कोरोना निरबंधामुळे येथे भरनारा आठवडी बाजार गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरीकांना ताजा भाजीपाला मिळने बंद आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी भाजीपाला विक्रीस आनतात बाजार बंद असल्याने त्यांच्यावरही मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे पवनार येथील आठवडी बाजार चालू करावा अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे भाजीविक्रेत्यांनी निवेदनातुन केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्याने जिल्ह्यातील आठवडी बाजार गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे, पवनार येथील आठवडी बाजार हा सोमवारी भारत असल्याने, शेतकऱ्यांच्या शेतातील ताजा भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची इथे चांगली झुंबड असते, दुपारी चार ते सायंकाळी आठ पर्यंत आठवडी बाजाराची वेळ असते, परंतु चार नंतर संचारबंदी लागू असल्याने सायंकाळी बाजार सुरू करता येत नाही.

बाजार बंद असल्यामुळे बाजारात व्यावसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हळू हळू सारे निर्बंध शिथिल होताना दिसून येत आहे परंतु आठवडी बाजाराला मात्र अजूनही निर्बंध आहे. कोरोनाचे नियम पाळून बाजार सुरू करा अशी मागणी व्यवसायीकांनी आज १२ जुलै रोजी दिलेल्या निवेदनातुन सरपंच शालिनी आदमाने व ग्राम विकास अधिकारी डमाले यांना केली आहे.

यावेळी निवेदन देतांना भाजीपाला ठोक विक्रेता संघाचे शंकर वाघमारे, प्रशांत भोयर, रामेश्वर वाघमारे, गजानन दिवे, रमेश डुकरे, राजू मानकर, नारायण फाटे, गजानन मानकर, सुरेश मुडे,अजय फाटे, किसणा हजारे आदीची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here