अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार! बराच वेळ जखमीला मिळाली नाही मदत

वर्धा : सेवाग्राम येथून आपल्या दुचाकीने वर्ध्याकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाल्याची घटना रविवार (ता. ५) दुपारी १२ वाजताच्या सुमारास सेवाग्राम रोडवरील अग्रग्रामी शाळेजवळ घडली. राहुल मडावी वय २२ वर्षे रा. वडगाव (कला) तालुका सेलू असे मृतकाचे नाव आहे.

राहुल मडावी हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३१ डीजी ०२५२ वाहनाने सेवाग्रामकडून वर्धेकडे जात होता दरम्यान अग्रग्रामी शाळेजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली त्यात राहुलच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याच अवस्थेत बराच वेळ तो पडून राहिला वेळेत त्याला मदत मिळाली नाही आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अज्ञात वाहनाचा शोध सेवाग्राम पोलिस घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here