‘चिवत्या’ ने फोडले फेरीवाल्याचे डोके! लोखंडी काठीने केला हल्ला

चिकणी (जामणी) : येथील मनोज उर्फ चिवत्या शंभरकर याने मद्यधुंद अवस्थेत शुक्रवारी सकाळी गावात चांगलाच धुमाकूळ घातला. मनोज याने क्षुल्लक कारणावरून वाद करून शंकर वाणी यांच्यावर लोखंडी काठीने हल्ला केला. त्यांनी काठी हातावर अडविल्याने ते थोडक्यात बचावले. तर नंतर भास्कर काकडे यांच्या अंगावर मनोज धावून गेला. अशातच बसस्थानकावर गॅस, स्टोव्ह, शेगडी दुरुस्ती करणाऱ्या एका फेरीवाल्यावर मनोजने काठीने हल्ला करून त्याचे डोके फोडले.

माहिती मिळताच पोलीस पाटील गौतम मून यांनी घटनास्थळ गाठले. मनोजला समजावत असतानाच मनोज याने थेट पोलीस पाटील गौतम यांच्यावरही हल्ला चढविला. यात ते थोडक्यात बचावले. या प्रकरणातील आरोपी मनोज ऊर्फ चिवत्या शंभरकर याला ग्रामस्थांनी देवळी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. असे असले तरी मनोजच्या या प्रकारामुळे गावात काही काळाकरिता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here