

अल्लीपूर : येथील आबाजी मार्केटमधील ग्रा.पं.च्या मालकीच्या दुकानासह खोलीचा किराया वेळीच अदान केल्याचा ठपका ठेवून बुधवारी अल्लीपूर ग्रा.पं. प्रशासनाने दुकानाला सील ठोकले.
या थकबाकीदाराकडे तब्बल १६ हजार ८०० रुपये थकल्याने त्याला थकबाकी भरण्यासाठी तब्बळ तीन वेळा नोटीस बजावण्यात आली. परंतु, थकीत रक्कम न भरल्याने गाळ्याला सील ठोकण्यात आले आहे. ग्रा.पं.च्या आबाजी मार्केटमधील अन्य किरायदारांकडेही लाखो रुपयांची थकबाकी आहे. त्यांच्यावरही कारवाई होणार काय? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई अल्लीपूरचे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य हारून अली व ग्रा.पं. कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. अल्लीपूर ग्रामपंचायतीच्या या धाडसी कारवाईमुळे गावात एकच खळबळ उडाली होती.