मद्यपी कर्मचाऱ्याचा तहसीलमध्ये धिंगाणा! अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

आर्वी : येथील तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत मद्य प्राशन करून एका कर्मचाऱ्याने क्षुल्लक कारणावरून अधिकाऱ्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने चांगळीच खळबळ उडाली. मद्यप्राशन करून आलेल्या एका लिपीकाने पुरवठा अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांस शिवीगाळ केली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या कार्यालयात असलेल्या महिला कर्मचारी या घटनेने घाबरून गेल्या होत्या. या लिपिकाच्या दुसऱ्या कर्मचारी साथीदार घटनास्थळावरून पळाला. कर्मचारी यास तहसीलदार यांनीही समजण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा आवाज चढवून अरेरावी केली. उपविभागीय अधिकारी यांनी समजावून सांगितले परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या या कर्मचाऱ्याला शेवटी पोलिस ठाण्यात आणावे लागले. त्याची तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू होती. तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात या कर्मचाऱ्याला नेण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here