उद्यापासून अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते २ पर्यंतच! जिल्हाधिकारी यांचे आदेश

वर्धा : जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा राज्य शासनाच्या आदेशानुसार आजपर्यंत सुरू होती. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे जिल्हयात रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढली असल्याने त्या आदेशात अंशत: बदल करुन अत्यावश्यक सेवा उद्या शनिवार १७ पासून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.

परंतु यामध्ये खानावळ, हॉटेल व रेस्टॉरंट येथुन पुरविण्यात येणारी पार्सल सेवा, दुध संकलन केंद्रे, दुधाचे घरपोच वितरण सेवा या सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहतील. वैद्यकीय सेवा व मेडिकल या नेहमी प्रमाणे सुरु राहील, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आदेशात म्हण्टले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here