दुचाकीला कारची धडक! तीघे गंभीर जखमी; घटनास्थळावरुन कारचालक फरार

पवनार : वर्धेकडून पवनारकडे विरुद्ध दिशेने जानार्या दुचाकीला नागपुरवरुन वर्धेकडे जानार्या भरधाव कारने धडक दिली यात दुचाकीवर असलेल्या तीघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार (ता. १६) ७ वाजताच्या दरम्यान निलकंठ पक्षी असलेल्या प्रवेशद्वाराजवळ घडली.

वर्धेकडून पवनारकडे विरुदध दिशेने दुचाकीचालक एका लहान मुलासह असे तीघे एमएच ३२ आर ९१५७ या दुचाकीने येत होते दरम्यान नागपुरवरुन वर्धेकडे जानार्या कारने या दुचाकीस जोरदार धडक दिली यात दुचाकीवर स्वार असलेले तीघेही गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अपघात करुन कार घटनास्थळावरुन पसार झाली प्रत्यक्षदर्शींनी कारचा पाठलाग केला मात्र कार कार भरधाव वेगाने निघुन गेली. वृत्त लिहीस्तोवर जखमींची नावे कळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here