Home ◼️ संपादकीय वर्ध्यात सराफा दुकान फोडून ८.३० लाखांचे दागिने लंपास ; जुन्या म्हाडा कॉलनीतील...

वर्ध्यात सराफा दुकान फोडून ८.३० लाखांचे दागिने लंपास ; जुन्या म्हाडा कॉलनीतील मध्यरात्रीची घटना

वर्धा : मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी जुन्या म्हाडा कॉलनी परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुकान क्रमांक ११ मध्ये सराफा दुकानाचे शटर तोडून तब्बल ८ लाख 30 हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, पहाटे ५ वाजता उजेडात आली. संजय भगवान उदावंत (४१ रा. फत्तेपुरीया लेआउट) यांचे म्हाडा कॉलनीतील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सराफा दुकान आहे.

नेहमीप्रमाणे रात्रीला दुकान बंद करून घरी गेले असता, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मित्राने दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. संजय दुकानात गेले असता, त्यांना शटर वाकवलेल्या स्थितीत दिसले. त्यांनी पाहणी केली असता, चोरट्याने चांदीचे जोडवे, चांदीच्या अंगठ्या, चांदीच्या स्टोनच्या अंगठ्या, घुंगरू पायल, तसेच चांदीच्या तोरड्या, चांदीचे दागिने ठेवलेला डब्बा, चांदीचे लॉकेट, करंडे, अत्तरदानी, सोन्याचे नाकातील बेसरची पाच पाकिटे, असा ८ लाख 3० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेलेला दिसला. या प्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दिली.

फॉरेन्सिक टीप घटनास्थळी

दुकानफोडीची माहिती मिळताच, अप्पर अथीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्‍वर, पोलिस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे, पोलिस उपनिरीक्षक रामेसवर राय यांनी भेट देत पाहणी केली, तसेच सकाळी घटनास्थळी डॉगस्कॉड, फिंगरप्रिंट तज्ज्ञ, फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!