लोक सहभागातून विजय काॅलनीकरानी साकारला बगीच्या! खेळणी बसविल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य

मोहन सुरकार

सिंदी (रेल्वे) : स्थानिक विजय कॉलनी वॉर्ड क्रमांक ५ मध्ये ले-आऊटच्या राखीव जागेवर होत असलेले अतिक्रमण नागरिकांनी स्वतःच काढून पुढाकार घेत हनुमान मंदिर परिसरात बगीच्या बनविण्याच्या निर्णय घेतला व लहान मुलांच्या कारमणुकी व खेळण्यासाठी स्वखर्चाने घसरपट्टी, रोल्लर झुला, व्हॅलीबॉल नेट व व्हॅलीबॉल घेऊन देत परिसरात वृक्षारोपण केले. सुनसान पडलेली जागा आता मुलांना खेळण्यासाठी सज्ज झाली. लोकसहभागातून तयार झालेला बगीच्या इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

बगीच्या आणखी सूंदर बनविण्यासाठी स्थानिक वॉर्डातील नागरिकांनी पुन्हा निधी काढून स्वखर्चाने अनेक नवीन वस्तू तेथे बसविण्याचे ठरविले आहे. बगीच्या तयार करण्याच्या कामात सुभाष परखड, पांडुरंग कोपरकर, कान्हाजी झाडे, ज्ञानेश्वर सोनपितळे, शंकर कोपरकर, डॉ. संदीप खेडकर, अभिनव कलोडे, सौरभ भुते, राहुल सोरते, रमेश पवार, अनिकेत सोरते, सुरज कोपरकर, सचिन सोनपितळे, प्रतीक भगत, सौरभ कोपरकर, गजराज शिंदे आदींनी सहकार्य केले.

या शहरातील हा अभिनव उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत असुन वार्ड सौदर्यीकरन आणि बगीच्यासारख्या बाबी निर्मीतीबाबत पालिकेच्या उदासीनते बद्दल कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत असली तरी लोकसहभागातुन तयार केलेल्या बगीच्याची मात्र प्रशंसा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here