निवासी शाळेतील बाधितांची संख्या पोहोचली ९५ वर

हिंगणघाट : तालुक्यातील सातेफळच्या त्या निवासी शाळेतील ६९ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या चाचणीनंतर पुन्हा १७ जण कोरोना बाधित आढळल्याने बाधितांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. सातेफळ निवासी शाळेच्या वसितगृहातील कोरोनाग्रस्तांची संख्या शुक्रवारी ७८ वर पोहोचली होती. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या ६९ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त होऊन त्यातील १६ जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शनिवारी रुग्णालयाला प्राप्त झाला, असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किश्लोर चाचरकर यांनी सांगितले. तसेच स्थानिक पातळीवर दोघांची चाचणी केळी असता त्यात एकजण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे आता त्या निवासी शाळेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. दराग्यान कोरोनाग्रस्तांची ही आकडेवारी लक्षात घेऊन प्रशासनाने २० फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवलेल्या आहेत.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here