

वर्धा : कार पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला टायर बदलत असताना अचानक मागाहून भरधाव आलेल्या आयशर वाहनाने कारला जबर धडक दिल्याने कारमधील नववधू आणि तिच्यासोबत बसून असलेली एक महिला गंभीररित्या जखमी झाली. हा अपघात आजदा शिवारात सोमवार (ता. २३) सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला. गंभीर जखमींवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.