
वर्धा : तालुक्यातील सावली येथील बोरकर ले आऊटचे मालक अभिजित बोरकर यांनी लेआउट मध्ये असलेल्या ओपन प्लेस जागेवर जाळी व काटेरी ताराचे कुंपण केल्याने तेथील नागरिकांचा येण्याजाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला. प्लॉटधाराकांनी विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन गप्प राहण्यासाठी धमकावल्याले तसेच कंपाउंड घालण्याचा बनावट आदेश दाखविला. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने वर्धा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर ले आऊट धारक अभिजित बोरकर यांच्यावर योग्य ती कारवाई करून जाण्यायेण्या करीता रस्ता मोकळा करून देण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते वेळी परिसरातील प्लॉटधारक तसेच शिवसेना वर्धा तालुका प्रमुख गणेश ईखार, शिवसेना उपतालुका प्रमुख निलेश वैद्य, सुरज गुळघाने,यांच्या सह इतरही प्लॉट धारक उपस्थित होत.

















































