राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने हिंगणघाटात धरने आंदोलन! शेतकरी विरोधी धोरनाचा निषेध

हिंगणघाट : केंद्र सरकारने लागू केलेले कृषिविधेयक त्वरित रद्द करावे याकरिता राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने सर्वपक्षीय धरणे आंदोलन नंदोरी चौक हिंगणघाट येथे करण्यात आले. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

या धरणे आंदोलनाला महाविकास आघाडीने समर्थन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधीरबाबू कोठारी यांनी तीनही कृषिविधेयक शेतकरी विरोधी कसे आहे हे सविस्तर शेतकऱ्यांना समजवून सांगितले. त्यांचे मतानुसार हा विषय राज्याचा असल्यास कृषिविधेयक करण्याचा अधिकार राज्यसरकारचा आहे. केंद्र सरकार असे कायदे करू शकत नाही. केंद्र सरकार राज्य सरकारला निर्देश देऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने तीनही कृषिविधेयक तात्काळ रद्द करावे अशी विनंती केली.

धरणे आंदोलनाचे आयोजक तथा राष्ट्रीय किसान महासंघाचे सदस्य अनिलभाऊ जवादे यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरवातीलाच दिल्लीतील शेतकरी आंदोलनात बलिदान दिलेले गुरमित सिंह लेहरा यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटाचे मौन पाळले. केंद्र सरकारवर ताशेरे ओढत लॉक डाऊनच्या काळात केंद्र सरकारने हे कृषिविधेयक पारित केले त्यावेळी संपूर्ण देश भयभीत स्तिथीत होता. मोदी सरकार कामगार आणि शेतकरी विरोधी आहे. मोदी सरकारने योजना आयोग रद्द केला जो योजना आयोग सर्वसामान्यांच्या हिताचा होता. आणि नितीआयोग आणला जो श्रीमंतांच्या फायद्याचा आहे.

मोदी सरकार हे श्रीमंतांचे हीत साधणारे सरकार आहे. सर्वसामान्यांच नाही. शेतकरी व कामगारांची आर्थिक स्तिथी दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. म्हणून केंद्र शासनाचे तीनही कृषिविधेयकाचा विरोध करून जाहीर निषेध नोंदवला.

यावेळी राष्ट्रीय किसान महासंघाचे अनिल जवादे , कृ.उ.बा. स.हिंगणघाट चे सभापती सुधीरबाबू कोठारी, कृ. उ.बा. स. समुद्रपूरचे सभापती हिम्मतजी चतुर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजाभाऊ खुपसरे, पंढरीभाऊ कापसे, शिवसेना तालुका प्रमुख भोलाजी चव्हाण, भारत मुक्ती मोर्चाचे लक्ष्मीकांत जवादे , बहुजन मुक्ती पार्टी चे गेमदेव मैस्के, भारतीय किसान मोर्चा चे गजानन माऊसकर, सामाजिक कार्यकर्ते संदेश मून, अशोकराव चौहान, आफताब खान, अनिलभाऊ भोंगाडे, सतिशभाऊ ढोमणे, ज्वलंत मून, मंगला ठक, जयंत धोटे, इकबाल पहेलवान, राजेशजी पाटील, शकील अहेमद, सुधीरजी राऊत, दिलीपजी देवतळे, महेश माकडे, दिनेश वाघ, रामू सोगे, दिलीप पाटील, गीतेश मून, श्रीकांत वागदे, रमेश शेंडे, प्रशांत भटकर, प्रशांत भोयर, पंकज ठाकरे, या कार्यक्रमाचे संचालन गोकुलजी पाटील तर आभार प्रदर्शन गोपाल मांडवकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here