

वर्धा : पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी घडली. अमीत पेटकर असे आरोपीचे नाव आहे. एका १४ वर्षीय मुलगी दूध आणण्याकरिता जात होती. दरम्यान रस्त्यात तिला अडवून आरोपी अमीत पेटकर याने तिला ओढत निर्जनस्थळी नेले. यानंतर तिच्यावर जबरजस्तीने अत्याचार केला. ही घटना बालिकेने घरी आल्यावर कुटुंबियांना दिली. त्यानंतर पुलगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अमीत पेटकर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.