ट्रकच्या चाकात आल्याने महिलेचा मृत्यू! वर्धा-सेवाग्राम मार्गावरील अपघात

वर्धा : भरधाव ट्रकच्या मागील चाकात दुचाकी आल्याने मागे बसून असलेली महिला ट्रकच्या चाकात आली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी १२.१५ मिनिटांच्या सुमारास वर्धा-सेवाग्राम मार्गावरील पेट्रोल पंपासमोर झाला. बेबी कवडू तामगाडगे (६१) रा. बरबडी असे मृत महिलेचे नाव आहे. नेहा तामगाडगे व बेबी तामगाडगे या दोघी एम. एच. 3२ एल. २८५२ क्रमांकाच्या दुचाकीने वर्ध्याकडे येत होत्या. तर त्यांच्या मागाहून एम. एच. 3२ कयु .११०९ क्रमांकाचा ट्रक सिमेंटचे पाईप घेवून येत होता. दोन्ही वाहने पेट्रोलहपंपासमोर आली असता ट्रकच्या मागील चाकात दुचाकी अडकली. दरम्यान, दुचाकीच्या मागे बसून असलेल्या बेबी तामगाडगे जमिनीवर पडत भरधाव ट्रकच्या मागील चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर नेहा हिला किरकोळ दुखापत झाली.

वर्धा-सेवाग्राम मार्गाचे रुंदीकरण तसेच सिमेंटीकरणाचे काप सुरू आहे. असे असले तरी मागील काही महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू कासवगतीने तसेच नियोजनशून्य पद्धतीने होत असल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ट्रकचा मागील चाकात महिला आल्याची तसेच तिचा जागीच मृत्यू झाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. बघता-बघता घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. या अपघाताला रस्त्याचे काम पूर्णत्वास नेणारा कंत्राटदारच जबाबदारी असल्याची चर्चा घटनास्थळी होती. अपघातानंतर या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठून संतप्तांना शांत करीत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. आरोपी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here