विरुळ गावात पुन्हा दारुबंदीचा निर्णय! गावातील दारुबंदी महिला मंडळ पुन्हा एकवटल

योगेश कांबळे

देवळी : तालुक्यातील विरुळ (आकाजी ) येथे मागील पाच सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या माहामारी मुळे पोलीस प्रशासन पूर्ण व्यस्त होते. ते रात्रंदिवस जनतेच्या रक्षणासाठी ते नेहमी कार्यरत होते परंतु दारूविक्री वाले याचाच फायदा घेत विरुळ गावात व परिसरात दारूविक्रीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने गावात दारूविक्री व्यवसाय करणारे वीस ते पंचवीस दारूविक्रीचे दुकान थाटले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो
गावात पुन्हा दारुबंदी करावी यासाठी गावातील सरपंच व विरुळ येथील दारुबंदी महिला मंडळ व हुसेनपूर दारुबंदी महिला मंडळ यांना पुन्हा एकत्र आणून दारुबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र गायकवाड यांना विरुळ ग्रामपंचायत येथे बोलाविण्यात आले. यावेळी दारुबंदी बाबत सकारात्मक चर्चा करून दारुबंदी महिला मंडळ यांना पूर्ण सहकार्य करून पुन्हा दारुबंदी करण्यात येईल असे आश्वासन ठाणेदारांनी दिले.

यावेळी पुलंगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी व दारुबंदी च्या काळात खूप सहकार्य करणारे व आताच त्यांची सेलू येथे बदली झालेले अनिल भोवरे यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय, तंटामुक्ती, दारूबंदी, पत्रकार संरक्षण समिती, गुरुदेव सेवा समिती, तसेच गावातील नागरिकांच्या वतीने गावातील सरपंच दुर्गप्रसाद मेहरे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here