बसेस सेलूत येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय! वाहक चालकाची मुजोरी अद्यापही कायम

संजय धोंगडे

सेलू : तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेलूत बायपास मार्गे धावणार्‍या बसेस आता नवीन बायपासने जावू लागल्याने सेलूतील प्रवाशांना परत नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वर्धा तथा नागपूर येथून येणाऱ्या बसेसला सेलूला अधिकृत थांबा असतांना बसचालक, वाहक मनमानी पद्धतीने काम करत सेलूचे प्रवाशांना नवीन बायपास वर उतरून देत आहे बसेस आतमध्ये जुन्या बायपासने टाकण्यास विरोध करत असल्याने प्रवासी व वाहकात वाद होत असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्याचे ठिकाण असताना बस पकडायची झाली तर प्रवाशांना मुख्य महामार्गावर रस्त्याचे कडेला उभे राहून बस पकडावी लागते येथील बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या बसेस येत नाही बसस्थानक ओस पडले आहे. यासाठी अनेकदा आवाज उठवला बसस्थानक साठी अलीकडे मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला कामही सुरू आहे अरूद रस्ते आणि रस्तयावरील अतिक्रमण पाहता बायपास मार्गे बसेस जात होत्या यशवंत चौकात, बोरधरण चौरस्त्यावर बस थांबत होती.

आता तर नवीन बायपास झाला असून या मार्गावरील बसेस वाहक चालक त्या नवीन बायपासने नेतात नागपूर कडून येणाऱ्या बसेसला सेलूतून वर्धेकडे जाताना सुकळी स्टेशन रोडने नवीन बायपासवर जावे लागते हा मार्ग तसाही गैरसोयीचा ठरत आहे या मार्गाचे काम सुरू आहे यामुळे वाहन चालक सेलूत जुन्या बायपासने बस टाकण्यास धजावतात हे जरी खरे असले तरी ही प्रवाशाचे दृष्टीने नवीन बायपासवर उतरणे गैरसोयीचे त्रासदायक ठरू पाहत आहे. रात्री तेथून येणे धोक्याचे तसेच अंतर लांब पडत असल्याने गैरसोयीचे ठरत आहे सेलूवासीयाना बसचा प्रवास आता डोकेदुखी ठरू पाहत आहे प्रत्येक बायपासवर सेलूवासीयाना बस पकडावी लागेल तर स्थाधकाचा उपयोग काय असा प्रश्न विचारला जात आहे. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला गोंदिया आगाराची यवतमाळ कडे जाणारी बस सेलूतून टाकण्यास या बसचे वाहक व चालकाने विरोध केला यावरून नागपूर येथून येणाऱ्या प्रवाशासोबत वाद झाला वाहकाने मुजोरी कायम ठेवत तुम्ही कोणाकडेही जा आमदार, खासदार कडे जा बस सेलूत जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वाद वाढला शेवटी नमते घेत चालकाने बस सेलूतून आणली असे प्रकार नेहमीच घडत आहे. याला कुठेतरी आळा बसावा आणि सेलूतील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here