सुगंधीत तंबाखू विकणाऱ्यास अटक! ६६ हजार ७८४ रुपयांचा तंबाखू जप्त

वर्धा : प्रतिबंधित असलेल्या सुगंधीत तंबाखूची विक्री करणाऱ्या दीपक रमेश धोटे याला हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. त्याच्या निवासस्थानाहून ६६ हजार ७८४ रुपयांचा गुटखा जप्त करीत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई ७ रोजी शास्त्री वॉर्ड परिसरात करण्यात आली.

दीपक धोटे हा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूची विक्री करीत असल्याची माहिती होती. त्यावरून पोलिस पथक आणि अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत लोहार यांनी दीपकच्या घरी छापा मारला. त्याच्या घराची तपासणी केली असता, घरात विक्रीसाठी ठेवलेला सुगंधीत तंबाखू पानमसाला मिळून आला. त्याला अटक करून गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक के. एम. पुंडकर यांच्या निर्देशाने विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, सागर सांगोले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here