
पवनार : केंद्रीय सडक परीवहन व राज्य मार्ग, सुक्ष्म तथा मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी हे वर्धा येथे आले असता पवनार येथील चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी महामार्गावरील अर्धवट राहिलेले कामे पुर्ण करण्याबाबत ग्रामपंच्यायत प्रशासनाकडून निवेदन देण्यात आले.
पवनार येथील बुट्टीबोरी-तुळजापुर महामार्गावरील पवनार गावामध्ये झालेले कामे अर्धवट परीस्थीतीत आहे त्यात माहामार्गावरील गोमासे यांच्या घरापासून ते धाम नदीच्या पुलापर्यंत स्ट्रिट लाईट लावने, बस स्टॉप वरील दोन्ही बाजुने पक्क्या नालीचे बांधकाम करने, हायवे क्रॉसिंग चौकात चांगल्या प्रतीचे रिफ्लेक्टर लाईट , लावने, जुन्या वस्तीत जानारा ऑप्रोच रोडची रूंदी वाढवुन देने, नदीवरील पुलाखालील रॉमटेरीयल काढुन नदी साफ करून देने ही कामे अपुर्ण परीस्थीतीत असुन मागील 2 वर्ष पासून ही कामे अर्धवट स्थितीत आहे. ती कामे कामे पूर्ण करून देण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत पवनार कडून निवेदन देण्यात आले.
त्यांचे गावात आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पवनार ग्रामपंचायतच्या सरपंच शालीनी आदमणे, राहुल पाटणकर, शारदा वाघमारे, सविता पेटकर, मुनिश्वर ठाकरे, प्रशांत सावरकर, नलिनी ठोंबरे, गिता इखार, अनिता संजय काळबांडे, राजेंद्र बावणे, मंगला कुत्तरमारे, जयश्री आदमणे, शकुंतला नगराळे, प्रमोद सरोदे, सामाजीक कार्यकर्ते नितीन कवाडे तसेच गावातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.



















































