

वर्धा : कोरोना लाकडाऊन काळात मजुर वर्गाच्या हातालाल काम नसल्याने त्यांचे हाल होत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. अशा गरजू नागरिकांना तात्पुरती मदत व्हावी या उद्देशाने दिघी (बो) ग्रामपंचायत कार्यालय येथे जीवनावश्यक किराणा साहित्य इंडो ग्लोबल सोशियल सर्विस सोसायटीच्या वतीने वाटप करण्यात आले.
यामध्ये शेंगदाणे, चणे, कडधान्य, राजगीरा, पोहे, तुर दाळ, तेल, गूळ, मिठ पुडा, सोयाबीन वडी प्रती किलो देवून कोरोना आजारापासून सुरक्षित रहावे याकरिता इतर साहित्य देण्यात आले. यावेळी उपस्थित गावचे सरपंच घनश्याम कांबळे, उपसरपंच अमोलभाऊ दिघीकर, ग्रामसेवक अमोलीया वैतागे, पोलिस पाटील प्रतिभाताई फुलमाळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सोसायटीचे प्रोजेक्ट मॅनेजर रविराज मानकर यांनी आधार कार्ड द्वारे ऑनलाईन नोंदणी करून गरजूंना कीट वाटप करण्यात पारदर्शकता दाखवली. नागरिकांकडून तसेच ग्रामपंचायत पंचायत प्रशासनाकडून आभार व्यक्त करण्यात आले.