
पावनार : येथील श्रीकृष्ण ग्रामसेवा संघाला आठ वर्षे पूर्ण झाले तसेच बाल दिवसाचे अवचित्य साधून श्रीकृष्ण ग्रामसेवा संघ पावनार यांच्या वतीने सेवाश्रम बालगृह येथे अनाथ मुलांना व वृद्ध व्यक्तिंना कपडे व खाद्य वस्तूंचे वाटप करण्यात आले. महिला बचत गटाच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या या ग्रामसेवा संघाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या बचत केलेल्या रकमेतून गरजूंकरीता ही भट दिलली आहे. यावेळी सीमा, ठाकूर सोनाली, अंबुलकर, मधुनीका येवतकर, तृप्ती पडवे, वर्षा मंगरूळकर, वैशाली वाघमारे, महानंदा हुलके, प्रीती मेघे, अर्चना मेश्रे, गीता पडोळे, माधुरी नगराळे यांनी सहकार्य केले.

















































