शिवीगाळ करण्यास हटकले! कुऱ्हाडीने मारहाण

सेलू : आईला शिवीगाळ करण्यास हटकले असता कुऱ्हाडीने मारहाण करीत युवकाला जखमी केले. घोराड येथे ही घटना घडली. बंडू मगाम आणि शुभम मगाम हे दोघे रोहित पारधी याच्या आईला शिवीगाळ करीत होते. दरम्यान, रोहितच्या भावाने त्यांना हटकले असता दोघांनी त्याला कुऱ्हाडीने मारहाण केली. तसेच रोहित आणि त्याच्या आईलाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here