आग्निपथ’च्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन! केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

वर्धा : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ वर्धा तालुका ग्रामीण, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभाग व सर्व फ्रंट सेलच्या वतीने सोमवार 27 जून रोजी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्राच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर शांतता पूर्ण आंदोलन झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष मनोज चांदूर्कर यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर पांगूळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले. महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, सुधीर पांगूळ, सुनील कोल्हे, ज्ञानेश्वर मडावी यांनी करून शांतता आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या भारतीय सैन्यदलातील आग्निपथ योजनेचा विरोध दर्शविण्यात आला. केंद्र सरकारची आग्निपथ योजना वापस घ्या, वापस घ्या अशे नारे शांततापूर्ण देण्यात आले. तसेच आग्निपथ ही फसवी योजना असल्याचे म्हटले. चौथ्या वर्षी सैन्यातील तरूण निवृत्त झाल्यावर देशात बेरोजगारी वाढेल, असे मत व्यक्‍त केले. त्यासाठी अग्निपथ ही योजना केंद्र सरकारने त्वरित वापस घेण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतीरामनाथ कोविंद यांना देण्यात आले.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, महिला जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, शहराध्यक्ष सुधीर पांगूळ, सुनील कोल्हे, धर्मपाल ताकसांडे, ज्ञानेश्‍वर मडावी, राजेश राजूरकर, रिजवान पठाण, अर्चना भोमले, अविनाश सेलुकर, प्रतिमा जाधव, अनिशा मान, सोनाली कोपुलवार, प्रफुल्ल कुकडे, मनीष म्हसकर, प्रवीण बोबडे, अजय वैद्य, नकुल जुमडे, नजीम पठाण, घनश्याम कुमरे, शेख सत्तार, राजेश देवडे, सागर सबाने, विशाल हजारे, बाळाभाऊ माऊस्कर, नंदकुमार कांबळे, अरुणा धोटे, शैलाताई दीक्षित, विजू नरांजे, डॉ. सुजाता झाडे, प्रभाकर छोटे, चंदू लाखे, अरुणराव राऊत, सुवर्णा नगराळे, सोनू सुटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here