त्या’ रेती तस्करीतील वाहनावर कारवाईस विलंब का? रेतीचे ‘बद्रीत’ तर रुपांतर होणार नाही ना!उलट सुलट चर्चेला उधान

 

वणी : परशुराम पोटे

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सर्वत्र लाकडाउन असतांना सुद्धा वणी शहरात रेती तक्करी सुरुच होती. परिणामी या रेती तस्करांवर कारवाया करुन रेती तस्करांच्या मुसक्या महसुल विभाग व पोलीस प्रशासनातर्फे संयुत्क कारवाया करुन आवळल्यानंतर जणु काही रेती तस्करी बंद झाली की काय? असे वाटत असतांनाच रेती तस्करांनी नविन शक्कल लढउन उन्हाळ्यात पाण्यासाठी वापर असलेल्या ‘छोटा हत्ती’ या वाहनातुन चक्क रेती तस्करी सुरु असल्याची माहिती महसुल ला मिळाली होती. यादरम्यान दि.8 जुलै ला दु .1 वाजताचे दरम्यान शहरातील हमीद चौक येथे दोन छोटा हत्ती रेती खाली करत असल्याची माहिती महसुल व डि.बी पथकाला मिळताच घटनास्थळी पोहचले त्या ठिकाणी दोन टाटा एस ‘छोटा हत्ती’ क्र.एमएच 34 एम 6833 या वाहनाचा वाहन चालक दानीश शाकीर शेख (25)रा.एकता नगर व सोनु रंगरेज रा.एकता नगर वणी तर एमएच 27 एक्स 6421 या वाहनाचा वाहन चालक इजाज रंगरेज (26)रा.काजीपुरा वणी या वाहनातुन अवैद्य व विना परवाना रेती उत्खनन व वाहतुक करतांना आढळले. सदरचे दोन्ही वाहन कारवाई करिता वणी पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आले आहे. या घटनेला आता सात दिवस उलटुन गेले परंतु सदर वाहनांवर अजुन पर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.महसुल विभागाकडुन मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणाची चौकशी सुरु असुन सा.बां वि.कडुन अहवाल मागीतल्याची माहिती मिळाली आहे. परंतु वाहनासंदर्भात आरटीओ कडुन अहवाल का मागीतला नाही हे एक कोडेच आहे! विशेष म्हणजे जप्त केलीली रेती ‘बद्री’ दाखवुन सोडणार तर नाही ना! अशी चर्चा सुरु असुन कारवाईकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here