वेबपोर्टलवर मिळणार बाष्पके व पाईपिंगच्या आरेखनची मान्यता

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र हे बाष्पके व इतर संलग्न यंत्रणेच्या निर्मितीत अग्रेसर आहे. बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती /उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करणे गरजेचे असते. सध्या देशभरासह राज्यात कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे बाष्पके संचालनालयाला सेवा प्रदान करण्यात अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर बाष्पके संचालनालयाद्वारे बाष्पके व पाईपिंगच्या आरेखन मान्यतेसाठी www.mahaboiler.com या पोर्टल वर ऑनलाईन सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली. या सेवेचा शुभारंभ कामगार तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

            कामगार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार बाष्पके संचालक धवल अंतापूरकर यांनी पुढाकार घेऊन बाष्पक संचालनालयाद्वारे बाष्पके व पाईपिंगच्या आरेखन मान्यतेसाठी “www.mahaboiler.com” या पोर्टलवर ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे.
या पोर्टलचा मुख्य उद्देश हा कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये उद्योगस्नेही भूमिका ठेवत राज्याच्या व्यवसाय सुलभता धोरणाच्या अनुषंगाने राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावावा असा आहे. या ऑनलाईन सेवेमुळे उद्योजकांचा वेळ, पैसा, शारीरिक व मानसिक त्रास कमी होणार असल्याने अधिकाधिक उद्योजकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here