

हिंगणघाट : शिवीगाळ करण्यास हटकले असता युवकाच्या पोटावर चाकूने वार करीत जबर मारहाण केली. ही घटना सावली वाघ गावात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकाश बाबाराव मन्ने (3८) हा सलून दुकानात कटिंग करीत असताना तेथे रोशन भगत रा. सुलतानपूर आणि मोहित फुलझेले हे दोघे आले. काही वेळ थांबल्यावर ते परत निघून गेले. मात्र, काही वेळाने पुन्हा दोघेही सलून दुकानासमोर आले आणि प्रकाशला अश्लील शिवीगाळ करू लागले. प्रकाशने शिवीगाळ करण्यास हटकले असता मोहितने प्रकाशला पकडून ठेवत रोशन भगत याने पोटावर चाकूने जबर मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकाशच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.