
पवनार : येथे कोरोनाचा उद्रेक व्हायला लागला असून, गावात पहिल्या बळीची नोंद झाली आहे. नवीन वस्तीत राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेचा पती कोरोना निगेटिव्ह असला तरी शेजारचे कुटुंब कोरोनाग्रस्त असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे परिसरातील पाच घरातील व्यक्तींना गृह विलजीकरणात ठेवले आहे.
कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून अनेक दिवस प्रशासनाच्यावतीने काळजी घेतली गेली. आताही कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरूच आहे. आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रशमी कपाले या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मृत महिलेने लक्षणे असूनसुद्धा सुरुवातीला तपासणी केली नाही. अखेर त्रास वाढल्यावर सेवाग्राम रुग्णालयात दाखल झाल्या. फुफ्फुस निकामी झाल्याने त्यांना प्राणास मुकावे लागले,