युवकाची गळफास लावून आत्महत्या

वर्धा : राहत्या घरी युवकाने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना वडनेर ठाण्यांतर्गत येणाऱ्या बार्मडा येथे घडली. अमन मनोज आत्राम रा. बामडा असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन आत्राम यांची काही दिवसांपासून प्रकृती ठीक राहत नव्हती. या आजाराला कंटाळूनच त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकरणी बाळकृष्णा आत्राम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here