दुचाकीच्या अपघातात एका कुटुंबातील तिघे गंभीर

समुद्रपूर : रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघात तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना हळदगाव शिवारात घडली. राजेंद्र श्रीधर पुरनवार, वर्षा पुरनवार व दिया पुरनवार अशी जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, राजेंद्र पुरनवार हे पत्नी वर्षा, मुलगी दिया हिला सोबत घेऊन एम.एच. ४० ए. यू. ९९५१ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाट येथून नागपूरच्या दिशेने जात होते. वाहन हळदगाव शिवारात आले असता, रस्त्यावरील खड्डा चुकविताना वाहन स्लीप झाले. अशातच दुचाकीवरील तिघेही जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले.

ही बाब लक्षात येताच, पोलीस कर्मचारी निखिल वाडकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेत, अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिसांना दिली. त्यानंतर, रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here