चाकूच्या धाकावर धमकाविणाऱ्यास ठोकल्या बेड्या! तीन चाकू केले जप्त

वर्धा : चाकूच्या धाकावर नागरिकांना धमकाविणार्‍या गावगुंडास रामनगर पोलिसांनी अटक करीत त्याच्याकडून तीन चाकू जप्त केले. ही कारवाई गौरक्षण वॉर्ड परिसरातील आझाद जीम समोर करण्यात आली. रामनगर पोलीस गस्तीवर असताना संदेश उर्फ बादल महेंद्र शेंडे हा चाकूच्या धाकावर नागरिकांमध्ये दहशत पसरवताना मिळून आला.

पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडे असलेले तीन चाकू जप्त केले. ही कारवार्ड ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात संदीप खरात, पंकज भरणे, लाेभेश गाडवे, अजय अनंतवार यांनी केली.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here