‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर; बाप्पांना उत्साहात निरोप! पवनारात पर्यावरणपूरक मुर्ती विसर्जन

सतीश खेलकर

पवनार, ता. १९ : ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लबकर या’,चा गजर करीत घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या श्रीगणरायाच्या पूर्तींचे विसर्जन सुरू झाले आहे. रविवारी (ता. १९) सकाळपासून पवनार येथील धाम नदीपात्रालगतच्या विसर्जनकुंटडात पर्यावरणपूरक विसर्जन करुन भाविकांनी बाप्पांना मनोभावे निरोप दिला. जिल्ह्यात सर्वत्र श्रीगणेशाचे विसर्जन शांततेत पार पडत आहे.

वर्धेकरांकडून १० दिवस बाप्पांची मनोभावे पूजा-अर्चा करण्यात आली. वर्ध्यात मागील तीन-चार वर्षांपासून पर्यावरणपुरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन दिले जात आहे. यावर्षीही गणेशभक्तांनी आपल्या घरातील गणेशमृ्तचे पर्यावरणपूरक विसर्जन करून या उपक्रमाला साथ दिली, आणि नदीपात्र दुषित होणार नाही याची दक्षता घेत विसर्जनकुंडात मुर्तींचे विसर्जन केले.

घरोघरी बसविलेल्या मूर्तीपैकी बहुतांश मृतोंचे आज विसर्जन करण्यात आले. वर्ध्यात पर्यावरणाचा जागर म्हणून अनेक भांगात पाण्याचे कृत्रिम हौद निर्माण करून त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. वर्धेकरांकडून याही वर्षी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रशासनाकडून नागरिकांत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

निर्माल्याची वेगळी व्यवस्था…

निर्माल पाण्यात विसर्जीत केल्याने मोठ्या प्रमाणात पाणी दुषित होते याकरीता विसर्जनकुंडाजवळच निर्मांल्य टाकण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून तात्काळ या निर्माल्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. याकरीता ग्रामपंचायत कामगार परिश्रम घेताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here