भरधाव दुचाकी धडकली! चालकाचा जागीच म्‌त्यू; अमरावती-नागपूर मार्गावरील अपघात

तळेगाव (श्या.पंत.) : दुचाकीने भरधाव जात असताना दुचाकी अज्ञात वाहनाला धडकल्याने अपघात झाला. यामध्ये दुचाकीचालक जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ९.०० वाजता अमरावती – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय लाकूड आगारासमोर घडली.

नीलेश धनराज नेहारे (२२, रा. काकडदरा, वॉर्ड क्रमांक ६) असे मृताचे नाव आहे. हा युकक एमएच ३२ डब्ल्यू ८६४५ क्रमांकाच्या दुचाकीने अमरावती- नागपूर महामार्गाने तळेगाव येथून इंदरमारी शिवारात म्हशीच्या गोठ्यावर जात होता. यादरम्यान शासकीय लाकूड आगारासमोर त्याची दुचाकी अज्ञात वाहनाला धडकल्याने अपघात झाला. त्यामध्ये नीलेशच्या डोक्याला जंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता आरवींच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानोबा पडनाके, जमादार राजू शाहू, नितेश वाघमारे, कुणाल कांबळे, अनिल ढाकणे, देवेंद्र गुजर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here