चण्याच्या बिलावर भरदिवसा सुरु होती तांदळाची नियमबाह्य वाहतूक! ३४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

सिंदी (रेल्वे) : दिवसाढवळ्या समृद्धी महामार्गाने चण्याच्या बिलाचा आडोसा घेऊन तांदळाची नियमबाह्य वाहतूक सुरु होती. पोलिसांनी महामार्गावर नाकाबंदी करुन ट्रकसह ३४ लाख २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालकासह क्लिनरला अटक केली. ही कारवार्ड सिंदी (रेल्वे) पोलिसांनी रविवारी केली.

समृद्धी महामार्गाने नियमबाह्मरिता तांदळाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची माहिती सिंदी (रेल्वे ) पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संमृद्धी महामार्मावर नाकेबंदी करुन एम. एच. ४० सी. डी. ६७०९ क्रमांकाचा ट्रक थांबवून तपासणी केली. ट्रक चालक पवन चारमोडे याला विचारपूस केली असता ट्रकमध्ये चना असल्याचे सांगितले.

त्याबद्दल त्याने चण्याचे बिल दाखविले. परंतु तपासणीदरम्यान ट्रकमध्ये प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये तांदूळ भरलेला दिसला. पोलिसांनी वाहनचालकाला या तांदळाबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळून आले नाही. पोलिसांनी हा ट्रक जप्त केला असून या ट्रकमध्ये ६४४ पोते आढळून आले. त्यात २५४७ क्विंटल तांदूळ आढळून आला. याची किंमत ९ लाख २५ हजार २०० रुपये असून ट्रकची किंमत २५ लाख रुपये आहे. पोलिसांनी एकूण ३५ लाख २५ हजार २०० रुपयांचा माल जत्त केला असून या हा तांदूळ आला कुठून याचा शोध घेत आहे. पुढील तपास ठाणेदार वंदना सोनुने या करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here