
पुलगाव : बचतगटाच्या पैशाच्या कारणातून झालेल्या वादात दाम्पत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना फत्तेपूर शिवारात घडली. लता श्याम इंगळे, आणि श्याम इंगळे अशी जखमींची नावे असून याप्रकरणी मनीषा इंगळे हिने पुलगाव पोलिसात तक्रार दिली आहे. लता इंगळे ही घरी असताना लक्ष्मण मसराम हा आला. त्याने माझ्या पत्नीला चार महिन्यांचे बचतगटाचे 3६00 रुपये का भरायला सांगितले. असे म्हणून शिवीगाळ करीत काठीने जबर मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
तर वाद सोडविण्यासाठी श्याम इंगळे हा मध्यस्थी गेला असता त्यालाही जबर मारहाण करण्यात आली. तसेच धारदार शस्त्रांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सून मनीषा इंगळे हिच्या तक्रारीहून आरोपीविरुद्ध पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत.




















































