

योगेश कांबळे
देवळी : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात विविध शेतकरी संघटना, सामाजिक व राजकीय संघटनानी भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर युवा संघर्ष मोर्चाने देवळी बंद चे आव्हान केले होते. व्यापाऱ्यांकडून बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत उत्स्फूर्त कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
दुपारी ठीक एक वाजता युवा संघर्ष मोर्चा व आयटकच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या शहरातील प्रमुख मार्गाने फिरून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याबाबत तहसीलदारा मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे व आयटक चे दिलीप उटाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी किरण ठाकरे, गौतम पोपटकर, प्रवीण कात्रे, दिलीप उटाणे, अर्चनाताई मुन,राम अंभुरे,गोपाल चोपडे, वैभव नगराळे, अशोक काकडे, अशोक पवार, दादा मुन, रवी कात्रे, प्रफुल भटकर,आयटकचे मनोहर पचारे, गोपाल काळे, बळीराम वैद्य, कुणाल कांबळे, निलेश तिडके, प्रकाश खडगी, रिझवान तंवर, दिलीप वाघमारे,सतीश राऊत, अमोल झाडे, धीरज चनेकार, अशोक राऊत, एकनाथ कांबळे, योगेश ढाकुलकर, विकास खडसे, अमित रघाटाटे, सुभाष पावसेकर यांची उपस्थिती होती.