नाट्य कलावंतांना हवे सानुग्रह अनुदान

विदर्भ वतन न्युज पोर्टल / नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेक नाट्य रंगकर्मींवर बेरोजगारी आली आहे. यात प्रामुख्याने पाडद्यामागील सहाय्यक नाट्य रंगकर्मीवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. अशा बिकट परिस्थितीत शासनातर्फे गरजु रंगकर्मींना सानुग्रह अनुदानाच्या रूपाने मदत मिळावी अशी अपेक्षा ठेवुन आंबेडकरी नाट्य परिषद नागपूर अधिनस्त कार्यरत विविध नाट्य संस्थांनी पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन सानुग्रह निधी मिळावी अशी मागणी केली.
प्रत्येक वर्षी मार्च ते जून या चार महिण्यातच अनेक महापुरूषांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य मोठ्या प्रमाणात राज्यभर होत असते परंतु यावर्षी कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्वप्रकारचे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले त्यामुळे नाट्यरंगकर्मीवर बेकारीचे संकट कोसळले आहे. सर्व नाट्य रंगकर्मींचे पोट नाट्य कलेवरच असल्यामुळे व विशेषत: पडद्यामागील नाट्यरंगकर्मी, वेषभूषा सहायक, नेपथ्य करणारी मंडळी, प्रकाश योजना सांभाळणारे तंत्रज्ञ व सहकारी, ध्वनी सांभाळणारे सहायक यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. या रंगकर्मीना इतर कोणतेच उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांची संपुर्ण भिस्त याच कलेवर असते. वर्षभराची मिळकत फक्त या चार महिण्यात त्यांना मिळत असते व त्याच्या भरवशावरच ते वर्षभर संसार चालवित असतात. आता हे चार महिनेच लॉकडाऊन असल्यामुळे वर्षभराचे काय होणार ही चिंता या कलावंताना सतावत असुन या भावना पालकमंत्र्यांनी शासनापुढे मांडाव्या अशी विनंती शिष्टमंडळाने त्यांना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here