शौर्य स्पोर्टस व्दारा रक्तदान शिबिराचे आयोजन! स्व.भिमबहादूर ठाकूर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य

सेलू : येथील तरुणाई मध्ये खिलाडू वृत्ती जागृत करणारे स्व. भिमबहाद्दूर ठाकुर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेलू येथील शौर्य स्पोर्टस द्वारा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले युवकाने जर ठानले तर तो नक्कीच आपल्या खिलाडू वृत्तीने आयुष्यात खूप काही साध्य करू शकतो हा आत्मविश्वास अनेक तरुणांत स्व.गजु ठाकूर यांनी भिंनवला सेलू आणि तालुक्यातील अनेक युवा मुलांना त्यांनी मातीशी जोडले आणि विविध मैदानी खेळात मुलांना तयार केले त्यांनी घडविलेले अनेक मुले उच्च स्तरापर्यंत पोहचले शिवाय अनेक तरुण हे पोलीस तथा सैनिक दलात कार्यरत आहे.

अश्या या मैदानी खेळ जगातल्या अवलियाने अनेकांना घडवून अगदी लहान वयात या जगाचा निरोप घेतला ते जरी या जगात नसले तरी त्यांनी घडविलेले अनेक तरुण अजून सुद्धा त्यांच्या आठवणी जोपासत आहेत त्यापैकी एक म्हणजे शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी सेलूचे खेळाडू २३ सप्टेंबर हा त्यांचा पुण्यस्मरण दिवस आठवणींना उजाळा मिळवा या करिता शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी सेलू व्दारा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले सध्याची कोरोणा स्थिती पाहता अनेक गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासत असते या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले यात ३२ रक्तदात्यानी रक्त दान करून आपला सहभाग नोंदवला सावंगी येथील विनोबा भावे रूग्णालय येथील रक्तपेढीचे माध्यमातून हे शिबिर घेण्यात आले यासाठी स्कुल ऑफ ब्रिलीयंट चे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here