वेळीच मालमत्ता कर अदा न केल्यास साहित्य जप्तीसह सील होणार पेट्रोलपंप! कदमांच्या पेट्रोलपंपाला पालिकेने बजावला वॉरंट

आर्वी : अवैध गर्भपात-भ्रूणहत्या प्रकरणामुळे आर्वी येथील कदम कुटुंबीय सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. आता याच कदम कुटुंबीयांच्या मालकीच्या तळेगाव मार्गावरील पेट्रोलपंपाला चालू व थकीत मालमत्ताक, न भरल्याने आर्वी नगरपालिका प्रशासनाने वॉरंट तामील केला आहे. येत्या ७२ तासांत पालिकेचा कर अदा न केल्यास पालिका प्रशासन थेट पेट्रोलपंपच सील करणार आहे.

अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणामुळे आर्वी येथील कदम हॉस्पिटल व कदम कुटुंबीय सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अवैध गर्भपात प्रकरण उजेडात येताच आणि आवींच्या कदम हॉस्पिटलकडून बायो मेडिकल वेस्टची स्वतःच नियबाह्य विल्हेवाट लावली जात असल्याचे पुढे आल्यावर आर्वी नगरपालिका प्रशासनानेही कदम कुटुंबीयांवरील फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर आर्वी नगरपालिकेच्या कर विभागाने कदम कुटुंबीयांच्याच मालकीच्या असलेल्या पेट्रोलपंपाला वेळीच मालमत्ताकर न ठरल्याचा ठपका ठेवून वॉरंट तामील केला आहे. विशेष म्हणजे कराचा वेळीच भरणा करावा, यासाठी कदम कुटुंबीयांना पालिका प्रशासनाने वारंवार सूचना दिल्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याने अखेर वॉरंट बजावण्यात आल्याचे आर्वी नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वॉरंटकडे दुर्लक्ष केल्यास साहित्य जप्तीसह पेट्रोलपंप सील करण्याची कार्यवाही पालिका करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here