
वर्धा : प्रात:विधीसाठी उघड्यावर गेलेल्या १५ वर्षीय मुलीवर गावातीलच २५ वर्षीय तरुणाने बळजबरी बलात्कार केला, ही घटना तक्रारीनंतर सोमवारी उघडकीस आली.
या प्रकरणी दहेगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रश्नांत ज्ञानेश्वर शिंदे (२५) रा. दहेगाव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवनीय मुलगी प्रात:विधीसाठी गेली असता प्रश्नांत लिंदे याने तिचा पाठलाग केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला ऐकटी असल्याने हेरून तिचे तोंड दाबत तिच्या वडिलांना जीवाने ठार करण्याची धकमी देत तिच्यावर बळजबरी बलात्कार केला.
घाबरलेली पीडितेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून तिने तिच्या वडगाव येथील एका नातेवाईकांचे घर गाठले. त्यानंतर स्वत:ला सावरत तिने तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर पीडितेने दहेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्ववे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.