

वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हातगाडीवर भाजीपाल्याची विक्री का करतो असे म्हणत वाद करून चौघांनी एकाला बेदम मारहाण केली. ही घटना आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर घडली, हरिषचंद्र बकाराम राणा असे जखमीचे नाव आहे.
हरिषचंद्र राणा याच्याशी वाद करून रिजवान शेख नजीर शेख, नजीर शेख गफ्फार शेख व त्याच्या दोन साथीदारांनी लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच प्रकरणी हरीशचंद्र राणा याच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यात क्षुल्लक कारणावरून वाद करून स्टेनफैल येथील हरीशचंद्र राणा याने जवळ असलेल्या कटरने नजीर शेख गफ्फूर शेख व रिजवान नामक युवकाला मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.