१४ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात! चार नगरपंचायतींची निवडणूक; छाननी प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष

वर्धा : जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या १४ जागांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण ६३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले आहे. छाननीच्या दिवशी नेमके किती उमेदवारांचे अर्ज बाद ठरतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागते आहे. न्यायालयाच्या आणि निवडणूक विभागाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून समुद्रपूर नगरपंचायतीच्या दोन, सेलू नगरपंचायतीच्या चार, कारंजा नगरपंचायतीच्या चार, तर आष्टी नमरपंचायतीच्या चार अशा एकूण १६ जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. सोमवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत समुद्रपूर येथे ११, सेलू येथे २२, कारंजा येथे ०९, तर आष्टी येथे २१ इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here