अपघातानंतर तो युवक 45 मिनिटे जागेवर पडून

पवनार : वर्धेवरून नागपूरकडे जाणाऱ्या 35 वर्षीय इसमाचा खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात घडला. ही घटना वर्धा-नागपूर रोडवरील दत्तपूर चौकातील हॉटेल डिलाईटसमोर शुक्रवारी सांयकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. युवकाचा अपघात झाल्यानंतर वेळेवर मदत न मिळाल्याने सदर दुचाकीस्वार 45 मिनिटे जागेवर पडून राहिला.

युवकाला रुग्णालयात पोहचविण्यासाठी कोणतेच वाहन थांबत नव्हते. 108 वर संपर्क साधूनसुद्धा रुग्णवाहिका वेळेवर पोहचली नसल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्‍त होत होता. शिवसेनेचे रमना गावाजवळील पदाधिकारी रमणा येथून वर्धा इथे जात असताना रोडवर एक दुचाकीस्वार पडून असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी प्रसंगावधान साधत सेवाग्राम पोलिसांना फोन करून त्वरित माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव अपघातग्रस्त इसमास आपल्या वाहनातून सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यामुळेच युवकावर वेळेवर उपचार होऊ शकले. रात्रीची वेळ असल्याने दुचाकीस्वाराची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here