उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर संपन्न! ४० रक्तपिशव्यांचे रक्त संकलन तर १७७ व्यक्तींची नेत्र तपासणी

वर्धा : रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत वर्धा येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. अभिजीत वाघमारे यांनी रक्तदानासंबंधी समाजात असलेले विविध समज-गैरसमज याबाबतीत मार्गदर्शन करून रक्तदान हे कसे सर्वश्रेष्ठ दान आहे हे समजावून सांगितले, तर डॉ. प्रफुल मेश्राम यांनी नेत्रदानाचे महत्त्व उपस्थितांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी सदर शिबिरामध्ये व्यक्तिशः भेट देऊन उपस्थितांना रक्तदान व नेत्रदान करण्याचे आवाहन केले. या शिबिरामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत सुमारे ४० रक्तपिशव्यांचे रक्त संकलन केले तर १७७ व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली.

रक्तदान शिबिराकरिता डॉ. अभिजीत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात प्रवीण गावंडे, अंकुश कांचनपुरे, आदित्य मेश्राम, उज्वला लांबसोंगे, किशोर महाजन यांचे सहकार्य लाभले तर डॉ. प्रफुल मेश्राम व डॉ. किर्ती कारोटकर यांच्या मार्गदर्शनात किशोर मेश्राम, विलास बाहे, प्रफुल काकडे व रवींद्र वाघमारे यांनी सहकार्य केले. यावेळी विवेक मोहेकर, रंजना लिंगरस, मेघल अनासाने, दीपक बोंबले, राजेश भुसे, विशाल मोरे, निलेश पाटील, अनुराग सालंकर, अमर पाखन या नऊ व्यक्तींनी नेत्रदान सहमती पत्रक भरून देऊन नेत्रदानाचा संकल्प व्यक्त केला.

सदरचे शिबिर आयोजित करण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक मेघल अनासाने, तुषारी बोबडे, साधना कवळे, निलेश पाटील, विशाल मोरे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मंगेश राठोड, अनुराग सालंकर, निखिल कदम, विशाल भगत, पांडुरंग वाघमारे, नरेंद्र तिवारी, अक्षय काटपातळ, राजेश किटकुले, दीपक बोंबले, भास्कर कापडे नितीन आंबिलकर, श्री रघटाटे, रूपाली सावरकर, श्रीमती नगरकर, श्रीमती सावरकर यांनी सहकार्य केले.

शिबीराला भेट….

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारा रक्तदान शिबीर कार्यक्रम अतिषय प्रशंसनीय आहे. रस्ते अपघातात अनेकांचे बळी जातात त्यातील अनेक जखमींना रक्ताची गरज भासते या रक्तदानातून त्यांची गरज भागविता येईल त्यामुळे या विभागाचा हा उपक्रम कौतूकास्पद आहे असे उद्गार यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे (गवई गट) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोकुल पांडे, याच्यासह शहर अध्यक्ष चिंतामण शंभरकर, जिल्हा अध्यक्ष नरेन्द्र पाटील यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here