कुजलेल्या अवस्येत आढळला मृतदेह

मारेगाव : तालूक्यातील नरसाळा येथील जुन्या गिट्टी क्रेशरच्या शासकीय जमीनीच्या बाजुला असलेल्या खड्याच्या पाण्यामध्ये एका व्यक्तीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. ही घटना दि. 21 नोव्हेंबरला रविवारी दुपारी दोन वाजे दरम्यान ही घटना उघडकीस आली.

भीमराव आत्राम (65) रा. नरसाळा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची वार्ता गावात वार्यासारखी पसरताच गावातील अनेकांनी मृतदेह पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस सूत्रानुसार सदर प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात आली.त्यानंतर ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून याघटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रूग्णालयात भीमराव याचा मृतदेह आनण्यात आला असून याघटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे. भीमराव यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here