दुचाकी अपघातात टोन जखमी! चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : मोपेड-दुचाकी अपघातात दोनजण जखमी झाल्याची घटना वर्धा- पवनार रोडवरील मामा-भांजे दर्ग्यांजवळ शनिवार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली. यातील फिर्यादीचे काका विलास किसनाजी कुमरे हे दुचाकी क्रमांक डी 32 फ 3524 ने गावातील अरुण गंगाधर धोबे यांच्यासोबत 19 नोव्हेंबरला सांयकाळी 4 वाजता दुचाकीवर वर्धेकडे येत असताना मामा-भांजे दर्ग्याजवळ मोपेड क्रमांक एमएच 32 एक्यू 8319 च्या चालकाने जोराची धडक दिली.

या अपघातात विसास कुमरे व गंगाधर धोबे यांना दुखापत झाली आहे. सदर जखमींना वर्धा येथील सामान्य रुग्णालयात उपाचरासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मोरेश्‍वर गणेशराव कुमरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोपेड गाडी क्रमांक एमएच 32 एक्यू 8319 च्या चालकाविरुद्ध सेवाग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here