चिकणी परिसरात शेळी चोरांची टोळी सक्रिय! पोलिसांनी लक्ष देण्याची गरज

चिकणी (जामणी) : अज्ञात चोरट्यांनी घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यातील चार शेळ्या चोरून नेल्याची घटना चिकणी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये शेळीपालकाचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.

येथील बाबा कोडपे यांनी कर्ज काढून महिनाभरापूर्वी ३० हजार रुपयांमध्ये चार शेळ्या घेतल्या. काही दिवसांतच त्यांना पिल्लं होणार होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास कोडापे कुटुंब झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास शेळ्या ओरडण्याचा आवाज आल्याने कोडापे जागे झाले. बाहेर येऊन पाहिले असता चार शेळ्या चोरी गेल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना घेऊन परिसर पिंजून काढला; पण चोरट्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तीन दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here