

तळेगाव (श्या.पंत.) : भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर अमरावती महामार्गांवरील देववाडी शिवारात शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास झाला.
देववाडी येथील राहुल रामदास दिग्रसे (२४), मारोती धारपुरे (२६) आणि गजानन कुमरे (२४) हे तिघे एमएच. ४९ ए. एक्स. ७८८९ क्रमांकाच्या दुचाकीने तळेगाव येथील सिडेट कंपनीत कामावर जाण्यासाठी गावातून निघाले. दुचाकी नागपूर- अमरावती महामार्गावर येताच नागपूरकडून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या डी.एन. ०९ यू. ९६७८ क्रमांकाच्या भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकी चालक राहुल दिग्रसे याचा जागीच मृत्यू झाला, तर मारोती धारपुरे आणि गजानन कुमरे हे गंभीर जखमी झालेत.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस स्टेशनचे दिगांबर रुईकर, मनोज आसोले आदींनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.